||धनगाई माता ट्रस्टतर्फे आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत||

  ||देवीची कथा||

देवी अवताराची कथा मोठी विलक्षण आहे. देवरे कुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नयगावी वास्तव्यास आले . त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थाफना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टीना कंटाळून तिथून जवळचा असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हीसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्तलांतर केले .त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूरलावल्यामुळे ती मूर्ती शेंदूरमुले लुप्त झालीव त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्ष्यात आले नाही . कालंतराने हे देव्स्तान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थान चा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४ मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले .साक्री येथील पोस्टमास्तर यांची पत्नी सौ .प्रमिला कुलकर्णी यांच्या अंगात देवीचा संचार झाला.धनदाई देवी त्यांच्या स्वप्नात येऊ लागली. त्यानंतर त्या स्वफुर्तीने धनदाई देवीच्या दर्शनासाठी म्हसदी गावात आल्यानंतर त्यांच्या अंगात देवीने संचार केला व येथून त्या देहभान विसरून धनदाई देवीच्या मंदिराकडे धावत सुटल्या . गावातील अनेक व्यक्ती त्यांचा मागे मंदिरापर्यंत येऊन पोचले . त्यांनी देवीची गळाभेट घेतली आणि त्या मूळ मूर्तीची तिथले शेंदुरलेपण विलग झाले. तिथे प्रकाश केल्यानंतर शेंदूर निघालेल्या ठिकाणी देवीचा कोरीव मुकुट असल्याचे दिसले. मुर्तीवरला शेंदूर काळजीपूर्वक काढण्यात आला तेव्हा आत मध्ये साडेतीन फुटाची सुबक कोरीव मूर्ती भक्तांच्या निदर्शनास आली .

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ॥
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥

ट्रस्ट विषयी

Companies that rely heavily on intelligent

   मंदीराची वेळ

Our valued customers appreciate & recognized the work we have done and the support we rendered in past. We believe in joint effort and our valued customers become our partners and their satisfaction becomes our success story!”

“Our valued customers appreciate & recognized the work we have done and the support we rendered in past. We believe in joint effort and our valued customers become our partners and their satisfaction becomes our success story”

||श्री धनदाई देवीची आरती||

जय जय धनदाई मन रमणी माता
कुलस्वामिनी चौदा भुवांनच स्वामिनी
महिषासुर मर्दिनी जय जय धनदाई ।।१।।

नेसली पातळ हिरवे गार हार शोभे गळा ।
हाती घेऊनिया त्रिशूल भाली कुमकुम टिळा ।
जय जय धनदाई ।।२।।

अंगी ल्यालीसे कुचोळी वर मोत्याची जाळी
हृदयी झळकती पिवळी शोभे ही गळसरी|
जय जय धनदाई ।।३।।

पायी खघागरिया स्वुळसबुळ नाकी मुक्ता-फळ
भाली केशरिया पुरवळ नयनी हे काजळ
जय जय धनदाई ।।४।।

रेड्यावरी या बैसोनि हिंडत रानो – राणी
तुजला नमितो निश – दिनी कुबेर नंदिनी ।
जय जय धनदाई ।।५।।

                 मंदिराचा संपर्क क्रमांक 

 

Message Us / Call Us(1234567890)

||धनगाई माता ट्रस्टतर्फे आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत||

Office Location

धंगाई माता मंदिर, धंगाईपाडा ता. साक्री

जिल्हा धुळे,महाराष्ट्र ,भारत

Open Hours

M-F: 8am – 6pm, S-S, 9am – 1pm